Sunday 26 June 2016

मनीष पांडे

मनीष पांडे देशांतर्गत पातळीवरील एक महत्वाचे नाव. राष्ठ्रीय पातळीवर कर्नाटकचे नेतृत्व करत खोऱ्याने धावा काढणारा खेळाडू. पहिल्यांदामनीष पांडेने आपली झलक दाखवली ती २००८ साली मलेशियात झालेल्या १९वयोगटाच्या विश्वचषकात जेव्हा भारताने विराट कोहलीच्या नेतृत्वात विजेतेपदाला गवसनी घातली. या कामगिरीच्या जोरावर त्याने आयपीएलच्या मुंबई इंडियन्स संघात स्थान मिळविले परंतु पाहिजे तितकी संधी मिळाली नाही पण आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात त्याला बॅंगलोर संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने संधीचा पुरेपुर फायदा उठवला. याच सत्रात त्याने ७३ चेंडूत नाबाद ११४ धावांची खेळी करून आयपीएलमधील पहिला भारतीय शतकवीराचा मानही मिळवला तसेच या खेळीने संघाला उपांत्य फेरीत धडक मारून दिली. सलग दुसय़ा सामन्यात ४८ धावांची खेळी करून संघाला अंतिम सामन्यात नेऊन ठेवले.
मनीष पांडेने देशांतगर्रत स्पर्धेच्या प्रत्येक स्पर्धेत धावांचा डोंगर उभा केला. २००९-१० च्या रणजी मोसमात त्याने चार शतके आणि पाच अर्धशतकांच्या सहाय्याने सर्वाधिक ८८२ धावा ठोकल्या. याच रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कर्नाटकला ३३८ धावांची आवश्यकता होती त्यात मनीषने १४४ धावांची खेळी केली पण ही खेळी मुंबईला विजेतेपदापासुन रोखू शकली नाही. मनीषने एक उत्कृष्ट फलंदाजाबरोबरच एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणूनही आपला ठसा उमटवला आहे. २०१२ व २०१४ साली कोलकत्ता संघाला आयपीएल चषक जिंकवण्यात मनीष पांडेचा मोलाचा वाटा होता त्यात २०१४ च्या अंतिम सामन्यात पंजाबविरूद्ध २०० धावांचे लक्ष्य असताना ५० चेंडूत ९४ धावांची खेळी करून संघाला विजय प्राप्त करून दिला.
२०१५ साली मनीष पांडेला पहिल्यांदा भारतीय संघात स्थान खेळण्याची संधी मिळाली ती झिंबाब्वे विरूद्ध आणि पहिल्याच सामन्यात केदार जाधव सोबत महत्त्वाची भागिदीरी करुन अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर त्याला संधी मिळाली ती ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत पहिल्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर त्याला संघाबाहेर बसावे लागले परंतु अजिंक्य रहाणे जखमी झाल्याने मनीषला शेवटच्या सामन्यात संधी मिळाली. भारताने आधीच मालिका गमवली होती पण व्हाईटवॉश रोखण्यासाठी विजय महत्त्वाचा होता. भारताला विजयासाठी ३३१ धावांची आवश्यकता होती त्यामुळे भारताला चांगल्या सुरुवातीची आवश्यकता होती पण चांगल्या सुरुवातीनंतर भारताने दोन फलंदाज झटपट गमावले पण रोहित शर्मा व मनीष पांडेने ९७ धावांची महत्त्वाची भागिदारी केली आणि मनीष पांडेने धोनी बरोबर ९४ धावांची भागिदारी केली व शेवटी मनीषने भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात मनीषने नाबाद १०४ धावांची खेळी केली ती फक्त ८१ चेंडूत. या कामगिरीच्या जोरावर त्याला झिंबाब्वे विरूद्धच्या संघात स्थान मिळाले पण त्याला हवी तितकी फलंदाजीची संधी मिळाली नाही.
      ऑस्ट्रेलियाविरूद्ध शेवटच्या सामन्यात शतकी खेळी करुन संघाला विजय मिळवुन दिल्यानंतर संघाला मधल्या फळीसाठी एक पर्याय दिला. त्यानंतर २०१६ च्या आयपीएल सत्रात १२ सामन्यात २४८ धावा काढल्या. त्यानंतर झिम्बाब्वेविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही पण टी-२० मालिकेतल्या पहिल्या सामन्यात ४८ धावा काढल्या खऱ्या पण तो भारताला विजय मिळवुन देण्यात अपयशी ठरला व भारताने २ धावांनी सामाना गमावला.

      २०१६ च्या न्युझिलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी मनीषचा संघात समावेश करण्यात आला तसेच धवनच्या अनुपस्थितीमुळे रहाणे सलामीला खेळल्याने पांडेला मधल्या फळीत खेळण्याची संधी मिळाली पण संधीचा फायदा उठवण्यात तो पुर्णपणे अपयशी ठरला आणि ४ डावांत फक्त ४८ धावा काढल्या. सद्यस्थितीत जर एखाद्या खेळाडुला संघातील स्थान टिकवायचे असेल तर कामगिरीत सातत्य असावे लागते कारण नवनवीन युवा खेळाडु जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवण्यास आतुर आहेत. एकदा संघातील स्थान गमावले की पुन्हा संघात संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे त्यामुळे मनीषला कामगिरीत सातत्य टिकवावे लागेल. त्यामुळे येत्या काळात त्याच्या कामगिरीवर सर्वांची नजर असेल.
शंतनु कुलकर्णी

No comments:

Post a Comment