Thursday 25 August 2016

भारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी चेंडूच्या पर्वाची सुरुवात

सुरुवातीला लाल चेंडू नंतर पांढरा चेंडू आणि आता गुलाबी चेंडू. सर्वोत्तम क्रिकेट म्हटले की कसोटी क्रिकेटच अग्रस्थानी राहणार परंतु सध्याच्या वाढत्या टि-२० व एकदिवसीय सामन्यांमुळे नवोदित खेळाडुंचे कसोटी क्रिकेटकडे दुर्लक्ष होते. खेळाडंचा गैरसमज होतो की जेव्हा एखादा खेळाडू टि-२० व मर्यादित षटकांच्या सामन्यात यशस्वी ठरला की तो यशस्वी खेळाडू म्हणून गणला जाईल. परंतु इतिहास पाहिला तर ज्याप्रकारे सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, कुमार संगकारा, माहेला जयवर्धने, जॅक कॅलिस कसोटी क्रिकेट व एकदिवसीय क्रिकेटमध्ये यशस्वी झाले तितकेच ते टि-२० मध्ये यशस्वी झाले.आजच्या घडीला जर व्हिव रीचर्डस, कपिल देव, इम्रान खान, वासीम अक्रम खेळत असते तर त्यांनी टि-२० मध्ये आपला दबदबा निर्माण केला असता यात शंका नाही.
कसोटी क्रिकेट म्हणजे सभ्य माणसांचा खेळ ते पांढऱ्या पोशाखाने दिसुनच येते. जसा बदल प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचा असतो त्याच प्रकारे काळानुसार क्रिकेटमध्ये अनेक बदल घडुन आले जसे फ्रि हीट, धावक फलंदाजाच्या छाती व डोक्यावरुन उसळी घेत जाणाऱ्या चेंडूची संख्या, तीसरे पंच. एकदिवसीय क्रिकेटमध्ये लाल चेडू ऐवजी पांढरा चेंडू वापरला जाऊ लागला आणि पांढऱ्या शुभ्र कपड्यांची जागा रंगीत कपड्यांनी घेतली. आधी ६० षटकांचा खेळला जाणारा एकदिवसीय सामना आता ५० षटकांचा खेळला जातो.
प्रेक्षकांना कसोटी क्रिकेटकडे आकर्षित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एकदिवसीय सामन्यांप्रमाणेच कसोटी सामने दिवस रात्र खेळवण्यास सुरुवात झाली ती ऑस्ट्रेलिया-न्युझिलंड सामन्याने. गुलाबी चेडूचा वापर सुरु झाला आणि क्रिकेटमध्ये एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. त्याच धर्तीवर बीसीसीआयने २०१६ ची दुलिप ट्रॉफी गुलाबी चेंडुच्या सहाय्याने दिवस रात्र खेळवण्यास सुरुवात झाली. या आधी प.बंगाल मध्ये क्लब क्रिकेटमध्ये एका सामन्यात गुलाबी चेंडूचा वापर करण्यात आला पण पहिल्यांदाच संपुर्ण स्पर्धेत गुलाबी चेंडू वापरला जाणार आहे यामुळे फलंदाजा बरोबरच गोलंदाजाला समान संधी मिळणार आहे. निश्चितच याचा फायदा कसोटी क्रिकेटबद्दल आकर्षण निर्माण करण्यासाठी तसेच कसोटी क्रिकेटचे स्थान टिकवण्यात होईल.

शंतनु कुलकर्णी

Tuesday 23 August 2016

मालिका २-० ने जिंकुन भारताची दुसऱ्या स्थानावर घसरण तर पाकिस्तान कसोटी मध्ये अग्रस्थानी विराजमान

एक छोटी गोष्ट काय बदल घडवु शकते हे काल संपलेल्या भारत-वेस्ट इंडिजच्या मालिकेत दिसुन आले. अखेरच्या सामन्यात खेळ झाला फक्त २२ षटकांचा आणि सलग चार दिवस एकही चेडू टाकला गेला नाही, सामना अनिर्णित राहिला. चौथ्या सामन्यापुर्वी, श्रीलंकेनी ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ३-० ने जिंकली तसेच पाकिस्तानने इंग्लंडला २-२ असे रोखले आणि भारतीय संघ कसोटीमध्येअग्रस्थानी विराजमान झाला होता पण स्थान टिकवण्यासाठी भारताला विजय आवश्यक होता. मालिकेतील भारताची कामगिरी पाहता भारतीय संघ स्थान टिकवेल यात शंका नव्हती. मालिकेतवेस्ट इंडिजच्या संघाला भारताला हरवणे शक्य झाले नाही पण अखेरच्या सामन्यात पावसाने मात्र भारताला हरवले आणि कसोटी क्रमवारी सुरु झाल्यापासुन पाकिस्तानचा संघ अग्रस्थानी विराजमान झाला.

भारताने मालिका २-० ने जरी जिंकली असेल तरी अग्रस्थान गमवावे लागल्याने कोहलीच्या मनाला लागले असणार यात शंका नाही. आशिया खंडाबाहेर कोहलीच्या नेतृत्त्वाखाली पहिला दौरा तसेच अनिल कुंबळेचा प्रशिक्षक म्हणुन पहिला दौरा यामुळे या मालिकेचे महत्त्व काही वेगळेच होते. भारताने मालिकेत निर्विदाद वर्चस्व राखले, चेतेश्वर पुजारा व शिखर धवन तितकेसे सफल झाले नाहीत पण अश्विन, कोहली, रहाणे, राहुल आणि साहा यांनी फलंदाजीचा मनमुराद आनंद लुटला.
पहिल्या कसोटीपासुन भारताने वर्चस्व राखत पहिली कसोटी एक डाव व ९२ धावांनी जिंकली अशाच कामगिरीची उर्वरीत सामन्यांत पुनरावृत्ती करेल अशी आशा होती त्याप्रमाणे दुसऱ्या कसोटीत मोठा विजय मिळवण्याच्या उंबरठ्यावर भारतीय संघ होता पण रोस्टन चेसची नाबाद शतकी खेळी आणि त्याला जेसन होल्डर, यष्टिरक्षक शेन डावरीच व ब्लॅकवुडने दिलेली साथ यांनी पुर्ण दिवसभर टिच्चुन फलंदाजी केली आणि भारताला विजयापासुन रोखले. तीसऱ्या कसोटीत खेळ वाया गेला होता भारतीय संघ ५ बाद १२६ अशा अडचणीत सापडला होता पण अश्विन व साहाने शतके ठोकत भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन दिली. भारताला पहिल्या डावात १२८ धावांची महत्त्वपुर्ण भुमिका बजावली ती भुवनेश्वर कुमारने. दुसऱ्या डावात झटपट धावा करुन भारताने वेस्ट इंडिज पुढे शेवटच्या दिवशी ३४६ धावांचे अशक्यप्राय लक्ष्य ठेवले आणि गोलंदाजांच्या कामगिरीने वेस्ट इंडिजचा १०८ धावांत खुर्दा उडवला.
ज्याप्रकारे कोहलीने अश्विनच्या फलंदाजीवर विश्वास ठेऊन त्याला फलंदाजी क्रमवारीत बढती दिली ते आव्हान अश्विनने लिलया पेलले. अश्विने पुन्हा एकदा मालिकावीर पुरस्काराला गवसणी घातली. या मालिकेत त्याने १७ गडी बाद तर केलेच तसेच फलंदाजीत दोन शतकांसहीत २३५ धावा ठोकल्या अशी अष्टपैलु कामगिरी बजावली. आपल्या ३६ कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत अश्विनने तब्बल ६ वेळेस मालिकावीर पुरस्कार पटकवला आहे यात त्याने क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला सुद्धा मागे टाकले आहे. अशाच कामगिरीची पुनरावृत्ती येणाऱ्यामालिकांमध्ये भारतीय संघानी करावी हीच इच्छा.
शंतनु कुलकर्णी

Sunday 21 August 2016

भुवनेश्वर कुमार

सध्याच्या भारतीय संघातील मर्यादित षटकांसाठीचा महत्त्वाचा खेंळाडू.एखाद्याजलदगती गोलंदाजाने ५० षटकांच्या सामन्यात सलग १० षटंक टाकण्याची क्षमतातसेच त्याच्या स्विंगने फलंदाजाच्या मनात धडका भरते. तसे पाहिले तरभुवनेश्वर कुमारला जलदगती गोलंदाज म्हणने म्हणजे वसीम अक्रम, ब्रेट ली वशोएबअख्तर यांसारख्या गोलंदाजाचा अपमान पण तरीही भुवनेश्वर कुमारने कमी वेळातआंतरराष्ट्रीय स्थरावर आपले नाव कमावले. उत्तरप्रदेशातील मेरठ मध्येजन्मलेल्या भुवनेश्वरने देशांतर्गत स्पर्धांत उत्तरप्रदेशचे नेतृत्व केले.पहिल्यांदा भुवनेश्वरचे नाव आले ते दुलिप ट्रॉफीत मध्य विभागाकडुन खेळताना.उत्तर विभागविरुद्ध खेळताना उपांत्या सामन्याचा फासा पलटवला तसेच २००८-०९च्या रणजी ट्रॉफीतील अंतिम सामन्यात सचिन तेंडुलकरला देशांतर्गत स्पर्धांतशुन्यावर बाद करणारा पहिला गोलंदाज ठरला.
भुवनेश्वरकुमारची भारतीय संघात पहिल्यंदा वर्णी लागली ती २०१२ मध्येपाकिस्थानविरुद्ध मायदेशात झालेल्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत. भुवनेश्वरकुमारने आपल्या पदार्पणाच्या टी-२० आणि एकदिवसीय सामन्यात पहिल्याच चेडूवरगडी बाद केला. या मालिकेत त्याला ज्याप्रकारे स्विंग मिळत होता व फलंदाजबाद केले ते पाहता भुवनेश्वर भारताला आवश्यक असलेल्या गोलंदाजाची जागा घेऊशकतो असे वाटत होते. याच कामगिरीच्या जोरावर त्याला २०१३ साली भारतातझालेल्या बॉर्डर-गावसकर मालिकेत त्यात त्याने सुरुवातीला गडी बाद करुनअश्विन व जडेजाला चांगला साथ दिली.गोलंदाजी बरोबरच त्याने फलंदाजीत सुद्धाआपले योगदान दिले. पहिल्याच कसोटी सामन्यात त्याने महेंद्रसिंग धोनीसोबतनवव्या गड्यासाठी १४० धावांची भागीदारी केली व पहिल्या डावात मोठी आघाडीमिळवुनदिली.
भारताला २०१३ ची चॅम्पियन ट्रॉफी जिंकवण्यातही त्याने ठसा उमटवला.त्यानंतरवेस्ट इंडिजमध्ये झालेल्या तिरंगी एकदिवसीय मालिकेत ८ धावा देत ४ बळी घेऊनश्रीलेकेविरुद्ध आपली एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च कामगिरी बजावली यातत्यानेमालिकारवीर पुरस्काराला गवसणी घातली.मर्यादित षटकांच्या सामन्याप्रमाणेत्याला कसोटीत बळी मिळवण्यात आपयश येत होते पण फलंदाजीत तो आपली भुमिकाबजावत होता.पण याला अपवाद ठरली २०१४ इंग्लंड विरुद्धची मालिका. या मालिकेतत्याने भारताकडुन सर्वाधिक बळी घेतले तसेच फलंदाजीत सुद्धा तीन अर्धशतकेझळकावली. त्यात लॉर्डसच्या कसोटीमध्ये त्याने जडेजासोबत केलेली ९९ धावांचीमहत्त्वाची भागिदारी केली व इंग्लंडला मोठे लक्ष्य दिले. भुवनेश्वर २०१५च्या विश्वचषकात महत्त्वाचा ठरणार होता परंतु तंदरुस्ती त्याला अंतिम ११खेळाडूंमध्ये संधी मिळवण्यात अडथळा ठरत होती. त्याने फक्त एक सामना खेळलापण तो त्याच्याशैलीतदिसलानाही.
      मायदेशात झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० व एकदिवसीय मालिकेतभुवनेश्वरला सपशेल अपयश आले.टी-२० मध्ये तर त्याला एकही गडी बाद करता आलानाही आणि एकदिवसीय मालिकेत त्याने ७ गडी बाद केले त्यासाठी त्याला मोठ्याधावामोजायला लागल्या. शेवटच्या सामन्यात तर त्याने एक गडी बाद करत तब्बल १०६धावा दिल्या. कसोटी सामन्यात त्याला संधी मिळालीच नाही.२०१६ च्याविश्वचषकात त्याला संघामध्ये स्थान मिळाले नाही पण आयपीएल मध्ये स्रर्वाधिक२३ बळी घेऊन संघाला विजेतेपद मिळवुन दिले.आयपीएल नंतरच्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील पहिल्या दोन सामन्यात बाहेर बसल्यानंतर त्याला तीसऱ्या सामन्यात उमेश यादवच्या जागी खेळण्याची संधी मिळाली आणि संधीचा फायदी उठवत पहिल्या डावात ५ तर दुसऱ्या डावात १ बळी घेतला. पहिल्या डावातील त्याच्या गोलंदाजीचे पुथ:करण २३.४-१०-३३-५ असे होते आणि त्याने वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना पुर्णपणे जखडुन ठेवले होते. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या अमेरिकेत झालेल्या टी-२० मालिकेतही तो अपयशी ठरला.

      मायदेशात न्युझिलंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतील एकाच सामन्यात भुवनेश्वरला संधी मिळाली त्यात ४८ धावांत ५ व २८ धावांत १ अशी कामगिरी केली तर दुखापतग्रस्त असल्याने कसोटी मालिकेनंतरच्या एकदिवसीय मालिकेत खेळू शकला नाही. दुखापतीतुन बाहेर आल्यानंतर त्याचा इंग्लंडविरुद्धच्या कसेटी मालिकेसाठीच्या संघात समावेश करण्यात आला पण पहिल्या तीन सामन्यात त्याला संधी मिळाली नाही परंतु मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाल्याने भुवनेश्वरचा संघात समावेश झाला तो मुंबईच्या सामन्यात त्यात त्याला १ गडी बाद करता आला. ज्याप्रकारे आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केल्यानंतर भुवनेश्वर त्याच्या स्विंग गोलंदाजीमुळे प्रकाश झोतात आला पण वेग वाढवण्याच्या नादात त्याची स्विंग गोलंदाजी हरवल्यासारखी वाटते. तसेच त्याची स्विंग गोलंदाजी त्याच्या आधीच्या वेगावरसुद्धा घातकच होती त्यामुळे स्विंग सोडुन फक्त वेगावर लक्ष देणे तर चूकिचेच आहे त्याचसोबत त्याला संघातील स्थान टिकवणे सुद्धा आवघड आहे.
शंतनु कुलकर्णी

Wednesday 10 August 2016

रोहित शर्मा

भारतीय एकदिवसीय संघाचा सलामीवीर. नागपुरमध्ये जन्मलेल्या या खेळाडुने मुंबईमध्ये आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. मुंबई म्हणजे देशातील क्रिकेटचे मुख्य केंद्र याच क्रिकेटसाठीच्या पोषक वातावरणात त्याने सुरुवातीला क्लब क्रिकेट,१९ वर्षांखालील स्पर्धात केलेल्या मेहनतीने व कामगिरीच्या जोरावर भारताच्या १९ वर्षांखालील संघात दाखल झाला. कालगिरीत सातत्य राखून त्याने मुंबईच्या रणजी संघात आणि त्यानंतर भारताच्या एकदिवसीय संघामध्ये समावेश झाला.

      २००७ साली पदार्पणाच्या सामन्यामध्ये त्याला ठसा उमटवता आला नाही पण ज्यावेळी सचिन,द्रविड आणि गांगुली यांनी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या टि-२० विश्वचषकात खेळण्यास नकार दिल्यानंतर एक युवा संघ स्पर्धेत पाठवण्यात आला त्यात रोहितचा समावेश होता.पहिल्या काही सामन्यात त्याला संधी मिळाली नाही पण दक्षिण आफ्रिकेविरुदधच्या महत्त्वाच्या सामन्यात त्याने संधीचे सोने केले.याच सामन्यात अर्धशतक झळकावत त्याने भारताला मोठी धावसंख्या उभारुन दिली तसेच क्षेत्ररक्षणात सुदधा चपळाई एका थेट फेकीवर फलंदाजाला धावबाद केले अशाच कामगिरीची पुनरावृत्ती करत अंतिम सामन्यात छोटेखानी पण महत्त्वाची खेळी केली आणि भारताला विश्वचषक जिंकवण्यात महत्त्वाची भुमिका निभावली.
२००८ साली ऑस्ट्रेलियात झालेल्या कॉमनवेल्थ चषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना त्याने एका कसलेल्या फलंदाजाप्रमाने फलंदाजी करत सचिनच्या साथीने मोलाची भागीदारी करुन भारताला मालिका जिंकुन दिली.टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडुन शतक झळकावण्याचा पहिला मान रोहितला जातो. निवृत्त खेळाडु तसेच भारताच्या सध्याच्या कर्णधाराला सुद्धा रोहितमध्ये असलेल्या क्रिकेट कौशल्यामुळे खूप अपेक्षा आहेत. संधी मिळत गेल्या पण रोहित हवी तशी कामगिरी करण्यात अपयशी ठरत होता. अपयशी ठरत असताना देखिल धोनी संधी देत होता आणि या कारणामुळे त्याला पत्रकारांना सुद्धा तोंड द्यावे लागत होते.
      आयपीएल मध्ये कामगिरी होत होती पण एकदिवसीय सामन्यात कामगिरी करण्यात तो अपयशी ठरत होता. त्यात २०१० साली कसोटीत पर्दापणाची संधी आली होती पण सामना सुरु होण्यापुर्वी फुटबॉल खेळताना दुखापत झाली आणि त्याला संधीपासुन मुकावे लागले.त्यानंतर सुमारे तीन वर्षांनंतर सचिनच्या निवृत्तीच्या मालिकेमध्ये त्याला संधी मिळाली आणि आलेली संधी दोन्ही हातांनी पकडुन दोन्ही सामन्यात शतके झळकावली.२०११ विश्वचषकाच्या संघात स्थान न मिळाल्याने निराश न होता त्याने कसुन मेहनत घेतली.
      आयपीएल मध्ये पहिली काही वर्षे हैद्राबाद संघाकडुन खेळला आणि प्रत्येक मालिकेत धावांचा पाऊस पाडत २००९ साली संघाला विजेतेपद मिळवुन दिले त्यानंतर त्याला मुंबई संघाकडुन सचिन सोबत खेळण्याची संधी मिळाली. २०१३ च्या आयपीएलमध्ये जेव्हा पॉंटिंगने कामगिरीत सातत्य नसल्यामुळे बाहेर बसने पसंत केले तेव्हा रोहितची कर्णधारपदी नेमणूक झाली. कर्णधारपदा बरोबरच त्याच्या कामगिरीतही सुधार आला आणि त्याने मुंबईला पहिल्यांदा चषक जिंकुन दिला. याच कामगिरीच्या जोरावर त्याला इंग्लंड मध्ये झालेल्या २०१३ सालच्या चॅंम्पियन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली पण यांमध्ये त्याला मधल्या फळीतील फलंदाज म्हणून नाही तर सलामीवीर म्हणून. मुरली विजय सारखा सलामीवीर संघात असुन सुद्धा धोनीने रोहितवर विश्वास दाखवला आणि रोहितने धोनीचा विश्वास सार्थ ठरवत संघाला चषक जिंकवण्यात मोलाचा वाटा उचलला.तेव्हापासुन लोक म्हणत असत की ''रोहित असलेल्या गुणांचा उपयोग करायला शिकला''.
      २०१३ ची ऑस्ट्रेलियाविरुद्धची मायदेशातील एकदिवसीय मालिका ज्यात मालिका २-२ बरोबरीत असताना शेवटचा सामना फलंदाजांसाठी अनुकुल असणाऱ्या बंगळुरच्या चिन्नस्वामी मैदानावर होता. मालिकेत मिळवलेल्या दोन्ही विजयात सलामीवीर (रोहित-धवन) व कोहली यांची भुमिका महत्त्वाची होती. त्यामुळे याही सामन्यात त्यांच्यावर जबाबदारी होता. त्यात पुन्हा एकदा रोहित-धवनने चांगली सलामी दिली आणि मोठ्या धावसंख्येचा पाया रचला त्यानंतर धवन व कोहली झटपट बाद झाले. दोन महत्त्वाचे गडी बाद झाल्यामुळे रोहितवर पूर्णपणे धावसंख्या पुढे नेण्याचा भार आला. पण पाहता पाहता रोहितने २०९ धावा ठोकल्या त्यात १६ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. यात त्याने एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावे केला. रोहितने मालिकाविराचा किताब पटकावला तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावलेला जगामध्ये सचिन आणि सेहवाग नंतर तीसरा खेळाडु ठरला त्यात तिघेही भारतीय. द्विशतक झळकावुन रोहितने सचिनचा विश्वास सार्थ करुन दाखवला.
२०१४ सालच्या श्रीलंकेविरुद्धच्या मायदेशातील एकदिवसीय मालिकेत दुखापतीमुळे रोहितला सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावे लागेल पण तंदरुस्ती सिद्ध करण्यासाठी श्रीलंकेविरुद्धच्या सराव सामन्यात धुवाधार फलंदाजी करुन भारतीय संघात पुनरागमन केले. ईडन गार्डन, कोलकत्ता येथे मालिकेच्या चौथ्या सामन्यात सुरुवात अडखळती होऊन सुद्धा रोहितने जम बसल्यावर त्याने त्याच्या भात्यातील सर्व फटके खेळून फलंदाजीचा आनंद लुटला आणि म्हणता म्हणता त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्वत:चे दुसरे द्विशतक झळकावले. यात त्याने २६३ धावा ठोकत एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली तसेच सामन्यात सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम आपल्या नावे केला.याच ईडन गार्डन मैदानावर २०१३ साली रोहितने कसोटीत पर्दापण केले. पर्दापणाच्या सामन्यात त्याने शतकी खेळी केली.
      २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या तिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले तसेच २०१५ च्या विश्वचषकातील उपउपांत्य सामन्यात बांग्लादेशविरुद्ध १३८ धावांची खेळी करुन भारताला मोठी धावसंख्या उभारुन दिली. त्यानंतर झालेल्या आयपीएल चषकात दुसऱ्यांदा मुंबईला विजेतेपद मिळवुन दिले. आफ्रिकेविरुद्ध मायदेशातील मालिकेत टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडुन शतक झळकावण्याचा मान मिळवला तसेच भारताकडुन टी-२० मध्ये सर्वोच्च धावा काढल्या तसेच एकदिवसीय मालिकेत १५० धावंची खेळी केली पण ही खेळी भारताला पराभवापासुन वाचवु शकली नाही.
      आपल्या दोन द्विशतकी खेळीने मर्यादित षटकांच्या सामन्यातील एक उत्कृष्ट फलंदाजामध्ये रोहितची गणना होऊ लागली.यात अजुन भर म्हणुन २०१६ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सलग दोन सामन्यात शतकी खेळी केल्या तसेच शेवटच्या सामन्यात ९९ धावांची खेळी केली करत मालिकाविराचा मान मिळवला. आतापर्यंत झालेल्या आयपीएल मध्ये फक्त दोन फलंदाजाना प्रत्येक सत्रात ३०० पेक्षा अधिक धावा करण्यात यश आले त्यात रोहितचा समावेश होतो. ऑस्टेलिया व श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेनंतर झालेल्या आशिया टी-२० चषकातील पहिल्याच सामन्यात बांगलादेशविरूद्ध ८३ धावांची महत्त्वपुर्ण खेळी केली पण उर्वरित मालिकेत रोहित पुर्णपणे अपयशी ठरला. त्यानंतरच्या टी-२० विश्वचषकात रोहितला एकही अर्धशतक झळकावता आले नाही फक्त उपांत्य सामन्यात ४३ धावांची खेळी करत उत्कृष्ट सुरुवात करून दिली होती. त्यानंतर आयपीएल सत्रात त्याने पाच अर्धशतकांच्या साह्याने ३८३ धावा काढल्या पण तो संघाला अंतिम चार मध्ये स्थान मिळवून देण्यात अपयशी ठरला. वेस्ट इंडिज दौऱ्यात रोहितला फक्त एका सामन्यात खेळण्याची संधी मिळाली त्यात त्याने दोन्ही डावात मिळुन ५० धावा काढल्या त्यानंतर अयोजित झालेल्या टी-२० मालिकेतल्या पहिल्या सामन्यात २४५ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ ५ व्या षटकात २ बाद ४८ अशा अवस्थेत होता परंतु त्यानंतर रोहितने राहूलच्या साथीने ७ षटकात ८१ धावांची भागिदारी करत भारताला स्थिरता मिळवून दिली होती त्यात रोहीतने ६९ धावांची खेळी केली होती पण भारतीय संघाला १ धावाने पराभव स्विकारावा लागला होता.
      न्युझिलंडविरूद्धच्या मालिकेतील तीनही सामन्यात रोहीतला खेळण्याची संधी मिळाली त्यातील पाच डावांत तीन अर्धशतकांच्या साह्याने २४० धावा फटकावल्या कसोटी मालिकेतनंतर झालेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या चार सामन्यात रोहितने १४, १५, १३ व ११ धावा काढल्या पण शेवटच्या सामन्यात ७० धावांची खेळी करताना दुखापतग्रस्त झाला त्यामुळे त्याचा इंग्लंडविरूद्धच्या मालिकेतसाठी संघातही समावेश झाला नाही बांगलादेश किंवा ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत तो पुनरागमन करू शकतो. रोहितला कसोटीसंघातले स्थान राखायचे असेल तर आतापर्यंतच्या परदेशदौऱ्यातील कामगिरी विसरुन पुढे जावे लागेल आणि तसेच भारताचा नवा कर्णधार हा परदेशात पाच गोलंदाज घेऊन खेळेल त्यामुळे स्वत:ची जागा कायम राखायची असेल तर कामगिरी सुधारणा आवश्यक आहे.

शंतनु कुलकर्णी

Friday 5 August 2016

श्रीलंकेच्या फिरकीने ऑस्ट्रेलियन फलंदाजीचा फास आवळला

पहिल्या सामन्याप्रमाणेच दुसऱ्या सामन्यातही ऑस्ट्रेलियन फलंदाजीना श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांचा यशस्वीपणे सामना करण्यात अपयश आले.पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात श्रीलंकेचा डाव ११७ धावांत गडगडला पण त्यानंतर श्रीलंकेच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सामना केला.पहिल्या डावात ८६ धावांची आघाडी घेऊन सुद्धा ऑस्ट्रेलियाला १०६ धावांनी पराभव स्विकारावा लागला यात तब्बल १८ बळी फिरकी गोलंदाजांनी घेतले आणि श्रीलंकेनी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा कसोटी विजय मिळवला तो १८ वर्षांनी. 
पहिल्या सामन्यातील पराभवातुन शिकुन ऑस्ट्रेलिय संघ एका जखमी वाघाप्रमाणे जोरदार कामगिरी करेल अशी प्रत्येकाची अपेक्षा होती पण श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजींनी वाघाच जणू मांजरच करुन टाकलं.वॉर्नरने ४२ धावा करत संघाला जोरदार सुरुवात करुन दिली पण १ बाद ५४ वरुन संघ ४ बाद ५९ अशा संकटात सापडला यातच संघाच्या ८० धावा झालेल्या असताना रंगना हेराथने सलग तीन चेंडुवर तीन गडी बाद केले आणि ऑस्ट्रेलियाची स्थिती ७ बाद ८० वरुन संघ १०६ धावांत संपुष्टात आला. इथे श्रीलंकेचे फिरकी गोलंदाज संघच्या संघ संपुष्टात आणतात तर ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांना एक-एक बळी मिळवण्यासाठी झगडावे लागते.
श्रीलंकेनी आपली आघाडी ४१२ धावांवर नेऊन ठेवली ती कर्णधार मॅथ्युज आणि दिलरुवान परेराच्या फटकेबाजीने.तीसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला फक्त ६ षटके खेळुन काढावयाची होती पण यातही त्यानी तीन गडी गमावत २५ धावा केल्या त्यामुळे चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघ संपुष्टात आला नाही तर नवलच.हा ऑस्ट्रेलियाचा आशिया खंडातील सलग आठवा पराभव असेल.आपल्या आक्रमक वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या खेळाडुंवर या मालिकेत मात्र नामुष्की ओढावली.श्रीलंकेच्या युवा खेळाडुंची कामगिरी कौतुकास पात्र आहे.

शंतनु कुलकर्णी