Friday 5 August 2016

श्रीलंकेच्या फिरकीने ऑस्ट्रेलियन फलंदाजीचा फास आवळला

पहिल्या सामन्याप्रमाणेच दुसऱ्या सामन्यातही ऑस्ट्रेलियन फलंदाजीना श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांचा यशस्वीपणे सामना करण्यात अपयश आले.पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात श्रीलंकेचा डाव ११७ धावांत गडगडला पण त्यानंतर श्रीलंकेच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सामना केला.पहिल्या डावात ८६ धावांची आघाडी घेऊन सुद्धा ऑस्ट्रेलियाला १०६ धावांनी पराभव स्विकारावा लागला यात तब्बल १८ बळी फिरकी गोलंदाजांनी घेतले आणि श्रीलंकेनी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा कसोटी विजय मिळवला तो १८ वर्षांनी. 
पहिल्या सामन्यातील पराभवातुन शिकुन ऑस्ट्रेलिय संघ एका जखमी वाघाप्रमाणे जोरदार कामगिरी करेल अशी प्रत्येकाची अपेक्षा होती पण श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजींनी वाघाच जणू मांजरच करुन टाकलं.वॉर्नरने ४२ धावा करत संघाला जोरदार सुरुवात करुन दिली पण १ बाद ५४ वरुन संघ ४ बाद ५९ अशा संकटात सापडला यातच संघाच्या ८० धावा झालेल्या असताना रंगना हेराथने सलग तीन चेंडुवर तीन गडी बाद केले आणि ऑस्ट्रेलियाची स्थिती ७ बाद ८० वरुन संघ १०६ धावांत संपुष्टात आला. इथे श्रीलंकेचे फिरकी गोलंदाज संघच्या संघ संपुष्टात आणतात तर ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांना एक-एक बळी मिळवण्यासाठी झगडावे लागते.
श्रीलंकेनी आपली आघाडी ४१२ धावांवर नेऊन ठेवली ती कर्णधार मॅथ्युज आणि दिलरुवान परेराच्या फटकेबाजीने.तीसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला फक्त ६ षटके खेळुन काढावयाची होती पण यातही त्यानी तीन गडी गमावत २५ धावा केल्या त्यामुळे चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघ संपुष्टात आला नाही तर नवलच.हा ऑस्ट्रेलियाचा आशिया खंडातील सलग आठवा पराभव असेल.आपल्या आक्रमक वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या खेळाडुंवर या मालिकेत मात्र नामुष्की ओढावली.श्रीलंकेच्या युवा खेळाडुंची कामगिरी कौतुकास पात्र आहे.

शंतनु कुलकर्णीNo comments:

Post a Comment