परिचय

            सर्वसाधारण पणे लक्षात घेता. असे लक्षात येते की, प्रत्येकालाच कोणता न कोणता तरी छंद असतो व तो जोपासण्यासाठीची पार्श्वभूमी मिळाली तर त्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती होतेच होते. हे मी स्वानुभावावरून सांगु शकतो.
           अगदी बालपणापासुन म्हणजे बोलता सुध्दा येत नव्हते, तेव्हा पासुन दुरदर्शन वर क्रिकेट पाहण्याची सवय लागली ती माझ्या बाबांमुळे बोबड्या भाषेत बाबांना क्रिकेट बद्दलचे एकना अनेक प्रश्न विचारुन भांडावून सोडायचा आणि माझे बाबा सुध्दा तेवढ्याच कुतुहलाने सर्व प्रश्नांची उत्तरे मला समजेल अशा शब्दांत सांगायचे. मग पुढे पुढे वर्तमान पत्रातील चिंटूची कात्रणासोबत क्रिकेट बद्दची माहीती खेळांडुचे फोटो इत्यादी कात्रण काढण्याची सवय आपोआपच लागून गेली व पुढे तीचे रुपांतर छंद जोपासण्यात झाले
           शालेय अभ्यास करता करता क्रिकेट बद्दलचा छंद जोपासत गेलो. यासाठी घरातुनही खुप प्रोत्साहन मिळाले इंजिनियरींग करता करता क्रिकेट बद्दलची माहीती स्वत:च्या शब्दात लिहिण्यात सुरुवात केली. आजच्या या डिजीटल युगात वावरताना निश्चत जाणवले की या छंदाचे स्वरुप सोशल मिडीयाच्या रुपात सर्वांपर्यत पोहचले तर किती चांगले होईल म्हणून आज फेसबुक, व्टिटर, ब्लाॅग, गुगल प्लस याद्वारे हे मांडण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न....

शंतनु कुलकर्णी 

No comments:

Post a Comment