के एल राहुल
कर्नाटकचा एक युवा खेळाडू. कर्नाटकच्या संघातीलएक महत्वाचा खेळाडू. २०१०-११ च्या
मोसमात पदार्पणात हवी तशी कामगिरी करता न आल्यामुळे पुढच्या मोसमात संघात स्थान
मिळाले नाही पण मेहनतीच्या जोरावर २०१२-१३ च्या सत्रात संघात स्थान मिळविले आणि
संघाचा महत्वाचा खेळाडू म्हणून स्थान राखले. राहूलने २०१३-१४ च्या सत्रात
रणजीमध्ये एक हजारपेक्षा अधिक धावा ठोकल्या आणि २०१३-१४ व २०१४-१५ या सलग दोन
सत्रात कर्नाटकला रणजीचे विजेतेपद मिळविण्यात महत्त्वाची कामगिरी केली.
देशांतर्गत
स्पर्धेतल्या कामगिरीच्या जोरावर त्याने भारताच्या कसोटी संघात स्थान मिळविले तेही
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत. पहिल्या सामन्यात साजेशी कामगिरी करता आली नाही
पण सिडनितल्या कसोटीत सलामीला येताना ११० धावांची खेळी केली. तसेच श्रीलंकेविरुद्ध
मालिकेत जखमी धवनच्या जागी राहुलला सलामीची संधी मिळाली आणि मिळालेल्या संधीचा
पुरेपुर फायदा उठवत शतकाला गवसणी घातली आणि भारतीय संघाला मालिकेत बरोबरी साधुन
दिली. त्यासामन्यात एका फलंदाजाबरोबरच यष्टीरक्षकाची भुमिका पार पाडली. धोनीने
कसोटीतुन निवृत्ती घेतल्यामुळे भारताला एका चांगल्या यष्टीरक्षाकाची व फलंदाजाची
कमतरता भासते. सध्या वृद्धीमान साहा यष्टीरक्षकाची भुमिका पार पाडतो पण त्याच्या
फलंदाजीबाबत साक्षंकता आहेत्यामुळे जर राहुलच्या कामगिरीत सातत्य राखले तर तो
साहाची जागा घेऊ शकतो.
कामगिरीत राखलेल्या सातत्याने राहुलचा आयपीएलच्या बॅंगलोर संघात
समावेश समावेश करण्यात आला त्यानंतर राहुलने २०१४ साली आयपीएल मध्येहैदराबादचे
नेतृत्व केले आणि २०१६ मध्ये बॅंगलोरला अंतिम सामन्यापर्यंत पोहचवण्यात महत्त्वाची
भुमिका निभावली. २०१६ च्या सत्रात राहुलने ३९७ धावा ठोकल्या याच कामगिरीच्या
जोरावर त्याची झिम्बावे दौय़ावर जाणाऱ्याएकदिवसीय
व टी-२० संघात तसेच वेस्ट इंडिज दौय़ावर जाणाय़ा कसोटी संघात निवड झाली. राहुलने
झिम्बावेविरुद्ध खेळलेल्या पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात शतकी खेळी आणि
भारताकडुन पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात शतकीखेळी करणारा पहिला खेळाडू ठरला तसेच
राहुलला पदार्पणाच्या मालिकेत मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. परंतु टी-२०
च्या पहिल्याच सामन्यात पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत झाला.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत राहुलला
संधी मिळेल की नाही असे वाटत होते पण पहिल्या सामन्यात मुरली विजय जखमी झाला आणि
त्या जागी धवन सोबत राहुल सलामीला आला आणि याचा पुरेपुर फायदा उठवत त्याने १५८
धावांची खेळी करत भारताला मोठी धावसंख्या उभारुन दिली त्याच बरोबर एक अर्धशतक
सुद्धा झळकावले. कसोटी मालिकेनंतर अमेरिकेत झालेल्या टी-२० मालिकेतील पहिल्या
सामन्यात वेस्ट इंडिजने २४५ धावांचा डोंगर उभा केला होता. २४५ चा पाठलाग करताना
भारतीय संघ २ बाद ४८ अशा स्थितीत होता त्यानंतर रोहित शर्मा व राहुलने तीसऱ्या गड्यासाठी ८९ धावांची तर चौथ्या गड्यासाठी राहुलने
धोनीसोबत १०७ धावांची भागिदारी केली यात राहुलने आपले पहिले टी-२० शतक झळकावले अशी
कामगिरी करणारा राहुल रैना व रोहित शर्मानंतर तीसरा खेळाडु ठरला.
वेस्ट
इंडिजविरुद्धच्या कामगिरीनंतर राहुलला विजयसोबत न्युझिलंडविरुद्धच्या कसोटी
मालिकेत सलामीला खेळण्याची संधी मिळाली. पहिल्या कसोटीत दोन्ही डावात संघाला
धडाकेबाज सुरुवात करुन दिली पण दुखापतीमुळे त्याला उर्वरीत कसोटी व एकदिवसीय
मालिकेला मुकावे लागले. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या
सामन्यात त्याने पुनरागमन केले याच मालिकेतील चेन्नई येथे झालेल्या पाचव्या व
शेवटच्या कसोटीत ३११ चेंडूत १९९ धावांची अनोखी खेळी खेळली यात त्याने १६ चौकार व ३
षटकार मारले. तसेच पार्थिव पटेलसोबत १५२ धावांची सलामी भागिदारी केली तर करुण
नायरसोबत १६१ धावांची चौथ्या गड्यासाठी भागिदारी केली आणि संघाला पहिल्या डावात
मोठी आघाडी मिळवुन दिली व भारताने ४-० ने मालिका खिशात घातली. पण जर त्याला संघात
कायम राहायचे असेल तर त्याला कामगिरीत सातत्य टिकवावे लागेल.
शंतनु कुलकर्णी
No comments:
Post a Comment