सुरेश रैना क्रिकेट
जगतात आपल्या चपळ क्षेत्ररक्षणाने झळकलेले एक नाव. उत्तर प्रदेशातील
मुरादानगरमध्ये जन्मलेल्या रैनाने आपल्या चपळ क्षेत्ररक्षण व फलंदाजीने सर्वांना
मोहून टाकले. रैनाने रणजीत उत्तर प्रदेशचे तसेच भारताच्या युवा संघाचे नेतृत्व
केले आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपरकिंगसाठी रैनाने केलेली कामगिरी अनोखी आहे.
रैनाने युवराज सिंग, महम्मद कैफ तसेच सध्याच्या जडेजा, रहाने व कोहलीच्या साथीने
आपल्या चपळ क्षेत्ररक्षणाने अनेक धावा रोखल्या तसेच अप्रतिम झेल घेतले.
भारताच्या युवा (१९
वर्षांखालील) संघासमवेत केलेल्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात समावेश करण्यात
आला. आपल्या पदार्पणाच्या सत्रात रैनाला हवी तशी कामगिरी करण्यात अपयश आले.
रैनाच्या अपयशी कामगिरीमुळे त्याला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. २००६ सालच्या
अपयशी कामगिरीनंतर संघाबाहेर गेल्यानंतर रैनाला दुखापतीने ग्रासले. दुखापतीतुन
बाहेर आल्यानंतर त्याने आपली कामगिरी सुधारण्यावर भर दिला. २००८ साली सुरु झालेली
आयपीएल रैनासाठी आशेचा किरण ठरला. रैनाची चेन्नई सुपरकिंग संघात निवड करण्यात आली
आणि त्याला भारतीय संघाच्या कर्णधाराच्या नेतृत्वात खेळण्याची संधी मिळाली.रैनाची
आयपीएलमधल्या कामगिरीच्या जोरावर स्पर्धेच्या यशस्वी फलंदाजामध्ये ओळख आहे. त्याला
आयपीएलच्या सलग सात सत्रात ४०० पेक्षा जास्त धावा करण्यात यश आले हीच कामगिरी
रैनाला भारतीय संघात परत येण्यात महत्त्वाची ठरली. रैनाने आपल्या कामगिरीच्या
जोरावर चेन्नई सुपरकिंगला आयपीएल चषक व चॅंपियन लिग तसेच जिंकण्यात तसेच
क्रिकेटविश्वात एक यशस्वी टी-२० संघ म्हणून नावारूपास आणले. भारतीय संघात पुन्हा
मिळालेली संधी रैना दोन्ही हातांनी मिळालेल्या संधीचा फायदा उठवण्याच्या तयारीत
होता.
संघात
सचिन तेंडूलकर, गौतम गंभीर, सेहवाग, युवराज असताना रैनाकडे मधल्या व खालच्या
क्रमांकावरील फलंदाजातील दूवा म्हणून पाहिले जात या संधीचा रैनाने पूर्णपणे फायदा
घेतला. तसेच धोनीच्या साथीने व युवराजच्या साथीने रैनाने भारताला सामने जिंकून
दिले. या कामगिरीच्या जोरावर रैनाची भारताच्या २०११ च्या विश्वचषक संघात निवड
करण्यात आली.विश्वचषकच्या सुरुवातीच्या काही सामन्यात रैनाला संघाबाहेर बसावे
लागले परंतु युसुफ पठाणची अयशस्वी कामगिरी रैनाला अंतिम ११ मध्ये संधी मिळण्यास
उपयोगी ठरली. या विश्वचषकत रैनाने उपउपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाविरूद्ध
केलेलीनाबाद ३४ धावांची खेळी तसेच उपांत्य सामन्यात पाकिस्तानविरूद्ध महत्त्वाच्या
क्षणी केलेली नाबाद ३६ धावांची खेळी भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात मोलाची ठरली
आणि भारताला विश्वचषक जिंकवण्यात मोलाची कामगिरी केली.
रैनाकडे
एकदिवसीय व टी-२० खेळाडू म्हणून पाहिले जाते पण रैनाने आपल्या कामगिरीच्या जोरावर
कसोटी संघात स्थान मिळविले व आपल्या पदार्पणाच्या कसोटीत श्रीलंकेविरूद्ध शतक
झळकावले पण रैनाला एकदिवसीय व टी-२० इतके यश कसोटीत मिळविण्यात अपयश आले आणि
त्याला संघाबाहेर रहावे लागले. टी-२० मध्ये भारताकडून पहिले शतक झळकावण्याचा
विक्रम रैनाच्याच नावावर आहे हे शतक रैनाने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध २०१० मध्ये
वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकत झळकावले. रैनाची ओळखही मर्यादीत
षटकांच्या सामन्यातील एक उत्कृष्ट फलंदाज तसेच एक पर्यायी ऑफ स्पिन गोलंदाजीसुद्धा
कर्णधाराला एक उपाय देतो. सध्या रैना भारतीय संघासाठी स्लिप मध्ये उत्कृष्ट
क्षेत्ररक्षण झेल पकडणे, धावा रोखणे आणि थेट फेकीने फलंदाज बाद करण्यात महत्त्वाची
भुमिका पार पाडतो.
रैनाने २०१४ साली इंग्लंडविरूद्ध ७५ चेंडूत
झळकावलेले शतक हे रैनाने त्याच्या कमकुवत गोष्टींवर काम करुन आपल्या आत्मसात करुन
कमकुवत गोष्टींना जमेची बाजू बनवली. २०१५ च्या विश्वचषकत रैना भारतासाठी
महत्त्वाचा खेळाडू होता. रैनाने झिम्बावेविरूद्ध झळकावलेले शतक जेव्हा भारताचे चार
गडी बाद झाल्यानंतर भारत अडचणीत सापडला होता आणि भारताला अजुन मोठ्या धावसंख्येचा
पाठलाग करायचा होता, रैनाने धोनीच्या साथीने भारताला विजय मिळवून दिला.विश्वचषकात
२८४ धावां काढत प्रभावी कामगिरी केल्यानंतर बांग्लादेशविरुद्धच्या मालिकेत छोट्या
खेळी करत ११२ धावा फटकावल्या पण तो भारताला मालिका पराभवापासुन वाचवु शकला नाही.
२०१५ आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० व एकदिवसीय मालिकेत रैना पुर्णपणे अपयशी ठरला. ५
सामन्यांपैकी ३ सामन्यांत तर त्याना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. चौथ्या
सामन्यांत त्याने ५३ धावांची खेळी केली पण त्यानंतरच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या
टी-२० मालिकेत ४१ व नाबाद ४९ धावांची खेळी करत भारताला ३-० ने विजय मिळवण्यात
महत्त्वाची भुमिका पार पाडली पण त्यानंतरच्या श्रीलंका, आशिया चषक व टी-२०
विश्वचषकात धावा काढण्यात तो अपयशी ठरला पण गोलंदाजीत आपले योगदान देत होता.
आयपीएलची सुरुवात झाल्यापासुन रैना धोनीच्या
नेतृत्वातील चेन्नई सुपरकिंगचे सलग ८ वर्षे प्रतिनिधित्व करत होता. पण २०१६ मध्ये
आयपीएलमध्ये नव्याने सामील झालेल्या गुजरात लायन्सच्या कर्णधारपदाची धुरा
सोपवण्यात आली त्यात त्याने संघाला अंतिम चार संघात स्थान मिळवुन दिले पण त्याच्या
संघाला उपांत्य फेरीत पराभव स्विकारावा लागला. न्युझिलंडविरुद्धच्या एकदिवसीय
मालिकेसाठी त्याची संघात निवड झाली होती पण सरावा दरम्यान दुखापतग्रस्त झाल्याने
त्याला एकही सामना खेळता आला नाही आणि त्याच्या जागी मिळालेल्या संधीचा केदार
जाधवने पुरेपुर फायदा उठवत अष्टपैलु कामगिरी केली. त्यामुळे एखाद्या दुखापतीमुळे
रैनाला एकदिवसीय सामन्यांतल स्थान गमवाव लागु नये हिच एक इच्छा. तसेच
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या संघातही त्याचा समावेश न झाल्याने त्याची
चॅम्पियन ट्रॉफीच्या संघात समावेश होण्याची शक्यता कमीच आहे.सद्यस्थितीत भारताकडे
मधल्या फळीत खेळणारे अनेक पर्याय उपलब्ध आहेत त्यामुळे रैनाला कामगिरीत सातत्य
ठेऊन फलंदाजीने भारताला सामने जिंकुन द्यावे लागतील.
शंतनु कुलकर्णी
No comments:
Post a Comment