महेंद्रसिंग धोनी
नाव जगातील सर्वोत्कृष्ट कर्णधारामध्ये घेतले जाते त्याचबरोबर भारताकडून सौरव
गांगुलीनंतर एक सर्वोत्कृष्ट कर्णधार. सुरुवातीला भारतीय क्रिकेट संघामध्ये मुंबई,
दिल्ली, बंगलोर, चेन्नई यासारख्या मोठ्या शहरातुन आलेल्या खेळाडूंचे प्रमाण मोठे
होते. परंतु काही कालावधी नंतर झहीर खान, महेंद्रसिंग धोनी, आर पी सिंग आणि
सध्याच्या भारतीय संघाचे फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर यांनी आपल्या विभागाचे
नाव जागतिक पातळीवर नावारुपास आणले.
भारतीय
संघात दाखल होण्यापूर्वी धोनी खरगपूर रेल्वे विभागात तिकीट तपासणीस म्हणुन काम करत
होता तेव्हा तो रेल्वे विभागाकडून क्रिकेट खेळू लागला. आपल्या क्रिकेटमध्ये
केलेल्या प्रगतीच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळविले. फुटबॉल खेळत असताना
गोलरक्षकाची भुमिका घेण्यास सुरुवात केली. रांची सारख्या छोट्या शहरातुन आलेल्या
धोनीला गांगुलीसारख्या सर्वोत्कृष्ट कर्णधाराकडून पर्दापणाची संधी मिळाली. आपल्या
पहिल्या तीन सामन्यात धोनीला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले परंतु त्यानंतर
पाकिस्तान विरूद्ध झालेल्या मालिकेत फरीदाबादमध्ये झालेल्या सामन्यात तीसऱ्याक्रमांकावर येताना १४८ ची खेळी करून एका नव्या आध्यायाला सुरुवात केली
आणि आपले पहिले शतक झळकावले. श्रीलंकेविरुध्द धावांचा पाठलाग करताना नाबाद १८३
धावांची खेली केली. ज्यात ११ षटकारांचा समावेश होता आणि १० षटकारांच्या विक्रमांची
बरोबरी केली त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसन ने बांगलादेश विरूध्द खेळताना १५
षटकार मारून विक्रम मोडला.
भारताच्या पाकिस्तान दौऱ्यातधोनीने आपल्या
केसरचनेनी तसेच आपल्या खेळीने त्यावेळेसच्या पाकिस्तानच्या राष्ट्रपतीपदी असलेल्या
परवेझ मुशरर्फ यांना भुरळ घातली होती. धोनीने एकदिवसीय सामन्यांनबरोबरच कसोटी
सामन्यात सुध्दा पदार्पण केले आणि संघाचा एक अविभाज्य भाग बनला. एकहाती सामना
फिरवण्याची ताकद यामुळे त्याने भारताला अनेक विजय मिळवून दिले. आपल्या
कारकिर्दितील पहिला विश्वचषक खेळणाऱ्याधोनीला साजेशी
कामगिरी करता आली नाही. विश्वचषकानंतर भारताचा इंग्लड दौरा होता यात पहिल्या कसोटी
सामन्यात भारताचा पराभव टाळला तर दुसऱ्या सामान्यात झालेल्या
भारताच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली आणि भारताला कसोटी मालिका जिंकण्यात यश
आले त्यानंतर झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताला पराभव स्विकारावा
लागला या मालिकेत धोनी पूर्णपणे अपयशी ठरला.
२००७ साली झालेल्या पहिल्या टि-२० विश्वषचषकातुन
सचिन, द्रविड व सौरवने माघार घेतल्याने कर्णधारपदाची पहिल्यांदा धोनीला जबाबदारी
देण्यात आली. तसेच एकदिवसीय मालिकेत झालेल्या पराभवामुळे द्रविडने कर्णधार पदाचा
राजीनामा दिला होता. २००७ च्या टि-२०
विश्वचषकात धोनीन आपल्या नेतृत्वाने तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध व उपांत्य
सामन्यात केलेली छोटेखानी खेळी सामन्याला कलाटणी देणारी ठरली आणि भारताला विश्वचषक
जिंकून दिला.आपल्या पहिल्याच कर्णधारपदाच्या परीक्षेत चांगले यश मिळविल्यानंतर
त्यालाच भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले यात कर्णधार
नेमण्यात सचिन तेंडूलकरची भुमिका महत्त्वाची होती. धोनीच्या कारकिर्दीतील
महत्त्वाची कामगिरी म्हणजे त्याच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियात २००८ साली
जिंकलेली तिरंगी स्पर्धा, २०१० ची आशिया चषक स्पर्धा व न्युझिलंडमधील एकदिवसीय
मालिका. २०१० साली भारतात झालेल्या बॉर्डर-गावसकर मालिकेत कसोटी कर्णधार अनिल
कुंबळेनी निवृत्ती घेतली आणि एकदिवसीय व टी-२० बरोबरच कसोटी कर्णधारपदी नेमणूक
केली आणि आपल्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवून दिला.
महेंद्रसिंग धोनीच्या कारकिर्दितला एक
महत्त्वाचा क्षण होता तो म्हणजे २०११ चा विश्वचषक. विश्वचषकापूर्वी संघाची कामगिरी
तसेच १५ वर्षानंतर भारतीय उपखंडात झालेला विश्वचषक यामुळे भारताला प्रबळ दावेदार
मानत होते. संपूर्ण विश्वचषकात धोनीला कामगिरी करण्यात अपयश आले होते पण
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धावांचा पाठलाग करताना सलामीवीर झटपट बाद झाले
त्यानंतर गंभीर व कोहलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला परंतु परिस्थिती सावरते असे
असतानाच कोहली बाद झाला आणि विश्वचषकात पहिल्यांदा धोनी युवराजच्या आधी फलंदाजीला
आला आणि ९३ धावांची नाबाद खेळी करुन त्याने भारताला विश्वचषक जिंकून दिला तसेच
धोनीला अंतिम सामन्याचा मानकरी म्हणून निवडण्यात आले.
विश्वचषकानंतर झालेल्या इंग्लंड दौऱ्यात भारताला ४-० ने कसोटी
मालिकेत पराभव स्विकारावा लागला तसेच एकदिवसीय मालिकेत ३-० ने पराभव झाला. एका
सामन्यात धोनीले केलेल्या फटकेबाजीच्या बळावर सामना बरोबरीत सोडवण्यात यश आले. इंग्लंड दौऱ्यात झालेला पराभवातुन संघ बाहेर येतो न
तोच संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत ४-० ने हार पत्करावी लागली तसेच
तिरंगी एकदिवसीय मालिकेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात संघ अपयशी ठरला. भारताची विदेशी भुमिवरची कामगिरी खालावत गेल्याने धोनीला
प्रसारमाध्यमांना तोंड द्यावे लागले तसेच कर्णधारपदाच्या राजीनाम्याची मागणीला जोर
धरु लागली.
२०१२ मध्ये पाकिस्तानविरुद्ध मायदेशात
झालेल्या मालिकेतही भारताला २-१ ने पराभव स्विकारावा लागला. मालिकेतल्या पहिल्याच
सामन्यात आघाडीच्या फलंदाजांनी जुनैद खान आणि महम्मद इरफान समोर नांगी टाकली
त्यानंतर धोनीने अश्विनच्या साथीने महत्त्वाची भागिदारी करत शतक झळकावले व भारताला
आव्हानात्मक धावसंख्या उभारुन दिली. धोनीने भारतीय संघाबरोबरच आयपीएल मध्ये ८
वर्षे चेन्नई सुपर किंगचे नेतृत्व केले या ८ वर्षात धोनीने संघाला २ वेळेस
विजेतेपद तसेच ४ वेळेस उपविजेतेपद मिळवून दिले त्याचबरोबर चॅम्पियन लीग मध्ये
दोनदा विजेतेपद मिळवून दिले.
२०१३ ची चॅम्पियन ट्रॉफी भारताला आशेचा किरण
घेउन आली. इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीत एका युवा भारतीय संघाने सर्व
मोठ्या संघांचा पराभव करुन अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव केला. इंग्लंडमधील
वातावरण हे वेगवान गोलंदाजासाठी अनुकुल असते पण चॅम्पियन ट्रॉफी पूर्वी झालेल्या
ऍशेस मालिकेसाठी इंग्लंडनेफिरकी गोलंदाजासाठी अनुकुल खेळपट्या तयार केल्या होत्या
हीच गोष्ट भारतीय फिरकीपटूंच्या पदरी पडली आणि रविंद्र जडेजाने सर्वाधिक विकेट
घेऊन सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार मिळविला. या स्पर्धेत भारताने अंतिम
सामनाधरुन सर्वच सामने जिंकले.
धोनी ज्याप्रकारे आयपीएल सामन्यात फलंदाजी
करतो तशी फलंदाजी आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये करण्यात तो अपयशी ठरला. २०१४ च्या
टी-२० विश्वचषकात भारत अंतिम सामन्यात दाखल झाला आणि भारताला श्रीलंकेकडून पराभव
स्विकारावा लागला. भारताला दक्षिण आफ्रिका व न्युझिलंडविरुद्ध झालेल्या
मालिकेमध्ये पराभवाला समोरे जावे लागले. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारताला
लॉर्डसचा कसोटीसामना जिंकण्यात यश आले परंतु कसोटी मालिकेत पराभव स्विकारावा लागला
पण त्यानंतर झालेल्या एकदिवसीय मालिकेत विजय संपादन केला भारतामध्ये २०१३ साली
झालेल्या बॉर्डर-गावसकर मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला ४-० ने लोळवले या मालिकेच्या
पहिल्याच सामन्यात चेन्नईत व्दिशतक झळकावूनभारताकडून कसोटीतव्दिशतकझळकावलेला पहिला
यष्टिरक्षक ठरला.
ज्याप्रमाणे धोनीने
फलंदाजी व कर्णधारपदात संघाची कामगिरी ही वेगळ्याच एका स्थरावर नेऊन ठेवली. मग ते 'हेलिकॉप्टर
शॉट' असो वा भारताच्या मर्यादित षटकांच्या सामन्यांतील
आजपर्यंतचा सर्वोत्तम कर्णधार असो. त्याच्या नेतृत्वात संघाने २००७ चा टी-२०
विश्वचषक, २०११ चा ५०-५० विश्वचषक आणि २०१३ मध्ये चॅम्पियन ट्रॉफीला गवसणी घातली
अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव कर्णधार आहे. तसेच तो तंत्रशुद्ध फलंदाज नाही
हे त्याने स्वत:ही सांगितले आहे आणि ते त्याच्या फलंदाजीतुन
सुद्धा दिसुन येते पण त्यातही त्याला इतके यश लाभले हे कौतुकास पात्र आहे.
ज्याप्रकारे
त्याने कर्णधापदी कामगिरी केली त्याचप्रमाणे त्याने यष्टिरक्षणसुद्धा एकदम वरच्या
पातळीवर नेऊन ठेवले आहे. मग ते झेल घेणे असो वा यष्टिचित करणे असो. काही वेळा तर
तो यष्टिंवर आलेली थेट फेक न पकडता यष्टिंकडे न पाहता चेंडू फेकुन फलंदाजांना बाद
केले तर सर्वांधिक यष्टिचित करण्याचा विक्रम त्याने त्याच्या नावे केला आहे. असंच
२०१६ च्या टी-२० विश्वचषकात बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात बांग्लादेशला
जिंकण्यासाठी शेवटच्या चेंडूवर २ धावांची गरज होती त्यावेळेस परिस्थितीचे भान ठेऊन
गोलंदाज हार्दिक पंड्याला चेंडू थोडी उजव्या यष्टी बाहेर टाकण्यास सांगितले तसेच
चेंडूची चांगली पकड व जलदगतीने चेंडू फेकण्यासाठी धोनीने उजव्या हाताचा ग्लोज
काढुन टाकला व त्यात तो यशस्वी सुद्धा झाला.
२०१४-१५ चा
ऑस्ट्रेलिया दौरा भारतासाठी मोठा तसेच आव्हानात्मक दौराहोता. कसोटीमालिकेत पहिल्या
सामन्यात धोनी दुखापतग्रस्त असल्याने खेळु शकला नव्हता परंतु मालिकेतला दुसरा
सामना धोनीसाठी कारकिर्दीतला शेवटाचा कसोटी सामना ठरला आणि एकदिवसीय व टी-२०
स्पर्धांवर लक्ष देण्यासाठी कसोटीतुन निवृत्ती घेतली. परंतु एकदिवसीय मालिकेत
वविश्वचषकात झिम्बांव्वे विरूध्दचा सामना सोडता धोनी पुर्णपणे अपयशी
ठरला.विश्वचषकानंतरच्या बांगलादेशविरूध्दच्या मालिकेत भारताला २-१ ने पराभव
स्विकारावा लागला. पहिल्या सामन्यात अजिंक्य रहाणे अपयशी ठरल्यानंतर त्याला
संघाबाहेर बसावे लागले याबाबत विचारले असता धोनीने सांगितले की उपखंडात रहानेला
स्ट्राईक रोटेट करण्यात अडचन येते तसे पाहता जेव्हा धोनीला पुर्णवेळ कर्णधार
म्हणून नेमले गेले त्यानंतर राहुल द्रविड व व्ही. व्ही. एस लक्ष्मण ने निवृत्ती
जाहिर केली. लक्ष्मणने तर संघात समावेश झाल्यानंतर निवृत्ती जाहिर केली होती
धोनीला पहिल्यापासुन युवा संघ हवा होता त्यामुळे सेहवाग, युवराज,
द्रविड, झहीर खान, लक्ष्मण
व गंभीर ला टीम पासुन बाहेर बसावे लागले.
२०१५
च्या आफ्रिकाविरुद्धच्या टी-२० मालिकेत धोनी पुर्णपणे अपयशी ठरला तर एकदिवसीय
मालिकेतील इंदोरच्या सामन्यात ९२ धावांची खेळी करत संघाला एक आव्हानात्मक
धावसंख्या उभारुन दिली. तर काही सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस येत मालिकेत
सातत्याने धावा काढणाऱ्या रहाणेची जागा प्रत्येक सामन्यागणिक बदलु लागला. त्यामुळे
त्याच्यावर टिकाही झाली. त्यानंतर २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या एकदिवसीय
मालिकेतील ४ सामन्यात धोनी अपयशी ठरला पण शेवटच्या सामन्यात ३४ धावांची खेळी करत
शतकवीर मनिष पांडे सोबत ९४ धावांची भागिदारी करत मालिकेत एकमेव विजय मिळवुन दिला
आणि हाच विजय भारताला टी-२० मालिकेत ३-० ने विजय मिळवुन देण्यात महत्त्वाचा ठरला.
धोनीची
अपयशाची मालिका श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत व २०१६ च्या टी-२० विश्वचषकातही
सुरुच राहिली. पण अमेरिकेत वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० मध्ये ४३
धावांची खेळी करत के एल राहुलला साथ देत १०७ धावांची भागिदारी रचली पण तो संघाला
विजय मिळवुन देण्यात अपयशी ठरला व भारताला १ धावेने सामना गमवावा लागला. तर त्याची
न्युझिलंडविरुद्धची कामगिरी त्यातला त्यात ठीक झाली. पहिल्या दोन सामन्यात मालिका
१-१ ने बरोबरीत झाल्यानंतर तीसऱ्या सामन्यात विजय मिळवुन आघाडी मिळवण्याती दोन्ही
संघ आतुर होते. न्युझिलंडने भारतासमोर २८५ धावांचे आव्हान ठेवले होते. २ बाद ४१
अशी अवस्था झाल्यानंतर कोहली व धोनीच्या जोडीने १५० धावांची भागिदारी करत भारताला
विजय मिळवुन देण्यात महत्त्वाची भुमिका बजावली यात धोनीने ८० धावांची उपयुक्त खेळी
केली तसेच भारताने मालिकेत ३-२ ने विजय संपादन केला.तब्बल ८ वर्षे आयपीएलमध्ये
चेन्नई सुपर किंगचे नेतृत्व केल्यानंतर २०१६ मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सचे
नेतृत्व केले. चेन्नई सोबतच्या ८ सत्रात त्याने संघाला ६ वेळेस अंतिम सामन्यात
प्रवेश मिळवुन दिला आणि त्यातील २ वेळेस विजेतेपद मिळवुन दिले व २ वेळेस
च्रॅम्पियन लीगचे विजेतेपद मिळवुन दिले खरे पण त्याप्रकारचा त्याचा करीष्मा २०१६
मध्ये चालला नाही आणि संघाला ७ व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
धोनीने
रहाणे बाबत दिलेले उत्तर पटत नाही. धोनी म्हणतो की रहाणे पहिल्या तीन स्थानांवरच
खेळु शकतो पण ज्याप्रकारे रहाणेची कसोटील कामगिरी पाहता रहाणे कोणत्याही स्थानावर
खेळु शकतो तसे पाहता ज्याप्रकारे द्रविड ने आपल्या कारकिर्दीत ४-५ क्रमांकावर
खेळुन १०,००० पेक्षा जास्त धावा केल्या त्यामुळे रहाणेची शैली
पाहता ४ क्रमांकावर खेळू शकतो. पण त्यावेळेस धोनीला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला
यायला पाहिजे होते त्यावेळेस खालच्या क्रमांकावर येण्यास पसंती देत. धोनी कर्णधार
झाल्यापासुन आयपीएल मधील धोनीच्या चेन्नई सुपर किंग संघातील खेळाडूंचा मोठ्या
प्रमाणावर भारतीय संघात समावेश झाला त्यात आश्विन, जडेजा,
मोहित शर्मा, बालाजी, मुरली
विजय यातील आश्विनने मुरली विजयने चांगल्याप्रकारे कामगिरी केली परंतु मोहित शर्मा
जो फक्त आपीएलच्या कामगिरी वर संघात कायम आहे. रैना व जडेजाने काही प्रमानात
कामगिरी केली पण रैनाला फलंदाजीत बढती साठी धोनी रहाणेचा बळी देतो आहे काॽ जडेजा
सुध्दा एक गोलंदाज म्हणुन कामगिरी करतो पण त्याला एक अष्टपैलु म्हणुन संघात ठेवले
होते. रहाणे सारखे खेळाडू हे संघातील राजकारणाचे बळी ठरत आहेत काॽ
No comments:
Post a Comment